Ad will apear here
Next
प्लास्टिक वापरणाऱ्यांना दंड करण्याचा शाळांना अधिकार


सोलापूर : ‘प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांना दंड करण्याचा अधिकार शाळांना दिला आहे,’ अशी माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी संजय राठोड यांनी फेसबुक लाइव्ह कार्यक्रमात दिली. जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.

या वेळी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी ‘चिमणी पाखरं’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, शिक्षक व पालकांशी संवाद साधला. शनिवारी (३० जून)  सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास फेसबुकवर डॉ. भारूड व राठोड यांनी पर्यावरण जनजागृती अभियान, प्लास्टिक व थर्माकॉल निर्मूलन, जनजागृती केली. हा कार्यक्रम फेसबुक लाइव्ह करण्यात आला होता. त्यामुळे जिल्ह्यातील शाळेतील विद्यार्थी व पालकांनी हा कार्यक्रम पाहिला.

रोपळे (ता. पंढरपूर) येथील शाळेतही मुलांना हा कार्यक्रम संगणकाच्या मदतीने दाखविण्यात आला. त्यावेळी शिक्षणाधिकारी राठोड यांनी प्लास्टिक वापरकर्त्यांना दंड करण्याचा अधिकार शाळांना दिले असल्याची माहिती दिली. या वेळी त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने शाळेच्या इमारतीवर पडणारे पावसाचे पाणी आडवून जमिनीत मुरवण्याच्या सूचना देतानाच प्रत्येक शाळेत परसबागा निर्माण करून विद्यार्थी व शिक्षकांना त्या बागेतील झाडे व वनस्पती जगविण्याचा सल्लाही या वेळी राठोड यांनी दिला.

या प्रसंगी मुलांचे कौतुक करताना तुम्ही फक्त पुस्तके वाचणारे विद्यार्थी नाहीत, तर चांगल्या गोष्टींचे अनुकरण करणारे विद्यार्थी असल्याचे सांगून शिक्षकांना गुणवत्ता वाढीवर भर देण्याच्या सूचनाही शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या.  या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक सुनील शिंदे, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZJMBP
Similar Posts
‘वनराई बंधाऱ्यांसाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा’ सोलापूर : ‘राज्यातील प्रत्येक गावात वनराई बंधारे उभारण्यात यावेत. वनराई बंधाऱ्याच्या माध्यमातून पावसाचे पाणी साठवून प्रत्येक गावात शाश्वत जलसिंचनाच्या साठा तयार करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा,’ असे आवाहन निवृत्त ग्रुप कॅप्टन प्रतापसिंह परदेशी यांनी केले.
‘टॅंकरबाबतचा प्रस्ताव ४८ तासांत पाठवावा’ सोलापूर : ‘या वर्षी सोलापूर जिल्ह्यात केवळ ३८ टक्केच पाऊस झाल्याने जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून टॅंकरसाठी मागणी येईल. अशी मागणी आल्यास टॅंकरबाबतचा प्रस्ताव ४८ तासांत पाठवावा,’ अशा सूचना पालकमंत्री विजय देशमुख यांनी दिल्या.
साडेतीन हजार पुस्तके भेट देणारा माणूस पंढरपूर : सावळ्या विठूरायाच्या पंढरीत विठूरायाच्या भक्तीने वेडी झालेली अनेक माणसे येत असतात. असाच एक वेडा माणूस पंढरपुरात आहे; पण त्याचे वेड जरा वेगळे आहे. ते वेड आहे लोकांना पुस्तके भेट देण्याचे. आजपर्यंत विविध प्रसंगांच्या निमित्ताने या माणसाने जवळपास साडेतीन ते चार हजार पुस्तके लोकांना भेट दिली आहेत
गांधी विचार परीक्षेचा निकाल जाहीर सोलापूर : जळगाव येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे घेतलेल्या गांधी विचार संस्कार परीक्षेचा जिल्हास्तरीय निकाल जाहीर झाला असून, यात रोपळे (ता. पंढरपूर) येथील पाटील विद्यालयातील दहावीची विद्यार्थिनी चैताली धोंडीराम भोसले हिने या परिक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language